इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य ( Islam Aani Sahishnuteche Bhavitavya ) -सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ

  • Rs. 135.00
    Unit price per 
  • Save Rs. 15
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. या चर्चेत इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना अनुदार किंवा कडव्या वाटतात, हे कुठलाही आडपडदा न ठेवता ते नवाझ यांच्यासमोर मांडतात. हे करताना अपराधीही वाटून घेत नाहीत आणि इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेही करत नाहीत. त्यावर नवाझसुद्धा स्वसमर्थनाचा पवित्रा न घेता चर्चा पुढे नेतात; बाजू उलटवण्याचा प्रयत्न करत ख्रिश्चन धर्मावर प्रतिहल्ला चढवत नाहीत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.

 

Book इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य 
Author सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ 
Publication  Sadhana Publication
Language  Marathi
Binding Paperback

We Also Recommend