जीनोम ( Genome) - २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा - मॅट रिडले

  • Rs. 340.00
    Unit price per 
  • Save Rs. 60
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

370आपले आनुवांशिक गुणधर्म गुणसूत्रांच्या २३
जोड्यांमध्ये असलेल्या छोट्या जनुकांच्या रूपात
साठवलेले असतात. प्रस्तुत पुस्तक म्हणजे मानवी
जनुकीय संचयातील (जीनोम) जनुकरूपी
मण्यांमध्ये ओवलेलं एक चित्तवेधक कथासूत्र
आहे. लेखकाने प्रत्येक गुणसूत्रातील एक अनोख जनुक निवडून त्याच्या
अभिव्यक्तीच्या परिणामाची शास्त्रीय कथा चितारताना विविध रूपकांचा
वापर करून ती रोचक केली आहे. ही कथा २३ गुणसूत्रीय प्रकरणांतून
मानवजातीच्या जनुकीय इतिहासाचा पट उलगडत जाते. प्रस्तावनेतून
होणान्या आनुवंशिकतेच्या कार्यप्रणालीच्या (डीएनए, जनुके, गुणसूत्रे)
आकलनाची शिदोरी पुढच्या वाचनप्रवासासाठी उपयुक्त ठरते.
२३ प्रकरणांतून 'रोग उत्पन्न करणे हे जनुकांचे कार्य नसून सजीवातील
प्रक्रिया सुरळीत चालू ठेवणे हेच जनुकांचे मूलभूत कार्य आहे, हे स्पष्ट करीत
अंतःप्रेरणा, बुद्धिमत्ता, गर्भविकास, गैगिकता, अमरत्वा अशा विविध पैलूंचा
जनुकांशी असलेला अनुबंध उलगडलेला आहे. अनुवंशशाखाच्या
दुरुपयोगाच्या धोक्यापासूनही सावध केले आहे.

पुस्तकाचे नाव
जीनोम - २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा
लेखक   मॅट रिडले
अनुवाद  डॉ. सुनीती धारवाडकर 

प्रकाशक

 मधुश्री पब्लिकेशन 

ISBN

 9788194589525

पुस्तकाची पाने

370

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend