जुलुमशाहीविषयी - प्रा. टिमथी स्नायडर

जुलुमशाहीविषयी - प्रा. टिमथी स्नायडर

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25

Order On WhatsApp

इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होत नसली तरीही
इतिहास आपल्याला खूप काही शिकवू शकतो. विसाव्या
शतकात युरोपीयन लोकशाही राष्ट्रे कोलमडून गेली आणि
नाझीवाद, फाशीवाद तसेच साम्यवादाच्या जुलमी पकडीत
सापडली. या साऱ्या चळवळींचे एकेक सर्वेसर्वा नेते होते, आणि
ते सारे स्वतःला लोकांचा एकमेव आवाज समजत होते, त्यांचे
जागतिक संकटापासून रक्षण करण्याचा दावा करत होते,
दंतकथा रचताना विवेकाला पायदळी तुडवत होते. युरोपीय
इतिहासातून आपल्याला दिसून येते एक स्पष्ट चित्र- समाज
कसे विदीर्ण होत जातात, लोकशाही व्यवस्था कशा ढासळत
जातात, आणि सर्वसामान्य लोक अकल्पनीय अशा भीषण
परिस्थितीत कसे सापडतात.
इतिहास आपल्याला या साऱ्याची ओळख करून देतो, सावध
करतो. विसाव्या शतकात लोकशाही व्यवस्थांचे बळी देऊन
जुलूमशाहीला शरण जाणाऱ्या युरोपीय लोकांहून आपण फारसे
शहाणे झालेलो नाही. पण राजकीय व्यवस्था पांगळी झालेली
असताना निदान आपल्याकडे एकच जमेची बाजू आहे की या
काळात आपण जुलुमशाहीची पुढे पडणारी पावले रोखू शकतो.
हीच वेळ आहे.

पुस्तकाचे नाव  जुलुमशाहीविषयी /On Tyranny
लेखक   प्रा. टिमथी स्नायडर / Timothy Snyder
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

9788194129837

पुस्तकाची पाने 150
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend