निळ्या डायरीची गोष्ट – श्वेता सीमा विनोद – Copy
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
“”माझ्या गावातल्या नदीत मी लहानपणापासून झेपायला, म्हणजे पोहायला
जाते. नदीची अन् माझी खूप ओळख आहे तशी. मी कधीकधी उलटं पोहत
असताना हळूहळू हात-पाय मारणं थांबवते. वासांची लय स्थिर झाली, की
हात-पाय न हलवताही बराच वेळ तरंगता येतं नदीत. तसं तरंगत
असताना वर आभाळ दिसतं. सूर्य असेल तर थोडा वेळ डोळे बंद करून
उघडले की, काळं-निळं चमकतचमकत मग थोड्या वेळाने आभाळ स्पष्ट
दिसतं. फक्त आभाळ दिसत राहतं. पाणी, आवाज, आपण कुठे आहोत हे
सगळं सगळं पुसट होत जातं. निळा रंग उतरत जातो… आतआत कुठेतरी.
आभाळच आतमध्ये येतं. मीच आभाळ होते. निळेपणा माझाच. बाहेरून
कुणी टाकलाच नाहीये हा निळा रंग माझ्यात. उलट माझ्यातलाच थोडा
उसना आभाळाला दिला होता वापरायला, आभाळ माझं निळेपण मला परत
करतंय. कायकाय वाटत राहतं. स्वतःच्या असण्याच्या सगळ्या जाणिवा
कमीकमी होत जातात. नष्ट होतात. उरतो तो हा रंग – निळा! हे चित्र
मला त्या निळेपणाजवळ घेऊन गेलं. तुम्ही हसाल, मी असं कायकाय
बोलतेय यावर, पण अजून एक सांगते. समाधी कशी घेतात याची मला
माहिती नाही. पण आनंदाने मरणाला मिठी मारणं म्हणजे समाधी असेल,
तर एक दिवस असंच आभाळाकडे पाहतापाहता गावच्या नदीच्या तळाशी
मी गेलेली असेल, असं मला अनेकदा वाटतं. खरंच, म्हणजे मी जर वेळेवर
भानावर आले नाही, तर हा सगळा निळेपणा लेऊन मी अगदी शांतपणे
पाण्याच्या आतआत जाईन, एवढी तंद्री लागलेली असते माझी. मी खूप
विचित्र काहीतरी बोलतेय असं वाटतंय मलाच. पण हे चित्र आवडण्याचं
कारणच हे आहे सर.
Reviews
There are no reviews yet.