Additional information
Weight | 257 g |
---|
Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
कोलंबसाला नवा भूखंड सापडला. मग पुढली १५० वर्ष युरोपमधल्या दर्यावर्दी
लोकांच्या साहसी मोहिमांचा काळ सुरू झाला. ते नकाशे बनवत होते. त्यांच्या
नकाशातल्या रेषा जिवंतपणे समुद्रात संचार करायला लागल्या. त्यांना सागराच्या
अक्राळविक्राळ स्वरूपाची भीती नव्हती की वादळांची तमा नव्हती. हिमनगांचीही
त्यांना धास्ती नव्हती. ते पछाडलेले होते स्वतःच्या महत्त्वाकांक्षांनी. सोनं, चांदी,
पैसा. श्रीमंती…
जॉईन्ट स्टॉक कंपन्या जन्मल्या… पुढे सरसावल्या…
इंग्लंडच्या सत्तेने तर मुलं-बाळं, बाया-पुरुष उत्तर अमेरिकेमध्ये रवाना करायला
सुरुवात केली. वेगवेगळ्या श्रध्दा असणारे, गोरे-गरीब-श्रीमंत अमेरिकेत थडकले.
इंग्लंडनं स्वतःच्या नियंत्रणाखाली वसवलेल्या १३ वसाहती. ब्रिटिश असण्याचा
वसाहतवाल्यांना अभिमान होता..
पण या सगळ्याला तडा गेला……
स्वातंत्र्य… स्वातंत्र्य… स्वातंत्र्य… मायभूमीपासून.
पण काळी, माणसं त्यांचं काय? तिथे काळी माणसं कशी आली? कोणी आणली?
का आणली? त्यांच्या स्वातंत्र्याचा आक्रोश दाही दिशांमध्ये निनादला. आणि
प्रथमपासूनच जे अस्तित्वात होते त्या रेड इंडियन्सचं काय केलं गेलं?
आणि या सगळ्याच्या तळात गोऱ्या स्त्रियांचाही आवाज उमटला…
मानवी इतिहासाचा आयामच ज्यानं बदलून टाकला असा देश जन्मला आला.
USA – संयुक्त राट्रसंघ – अमेरिका !
Reviews
There are no reviews yet.