बोलू नका करून दाखवा – राज शामानी
₹250.00 Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
शाळेत आपल्याला गणित आणि इतिहासासारखे विशिष्ट विषय शिकवले जातात. पण आपल्याला : * विक्री कशी करायची * नातेसंबंध कसे घट्ट करायचे * आव्हानांना कसं सामोरं जायचं स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची * स्वतःचं संपर्कजाळं कसं निर्माण करायचं * स्वतःच्या पैशांचं नियोजन कसं करायचं * हे शिकवलं जात नाही. मोठे झाल्यावर अशा प्रकारच्या, अतिशय अवघड परिस्थितीला आपल्याला अनेकदा सामोरं जावं लागतं, पण विद्यार्थी असताना याबद्दल कधीही चर्चा केली जात नाही. ही कौशल्य शाळेत कधीच शिकवली जात नाहीत, त्यामुळे जेव्हा लोकांच्या यशाच्या कहाण्या ऐकायला येतात, तेव्हा आपल्यालाही तसंच यश मिळेल याची खात्रीच वाटत नाही. उलट, आपण फारच बावळट आहोत, असं वाटतं. आपण अर्थातच बावळट नसतो, आपल्याला फक्त ही संपूर्ण यंत्रणा कसं काम करते, हे माहित नसतं. शर्यतीत कसं धावायचं, हे शाळेत शिकवलं जातं, पण जिंकायचं कसं, ते शिकवलं जात नाही. म्हणूनच हे पुस्तक : जिंकण्यासाठी तुम्हाला याची मदत होईल. उद्योजक आणि कन्टेन्ट क्रियेटर म्हणून जबरदस्त यशस्वी झालेल्या राज शामानीने त्याच्या प्रवासादरम्यानचे अनेक उपयुक्त, प्रभावी सल्ले या पुस्तकात सांगितलेले आहेत, आणि म्हणून, हे पुस्तक वाचायलाच हवं.
Reviews
There are no reviews yet.