सीआयए -एन. चोक्कन
Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00.
अमेरिकन गुप्तचर संस्थांमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सीआयएने २०व्या आणि २१व्या शतकांतील आंतरराष्ट्रीय राजकारणात काही अतिमहत्त्वाच्या घटनांमध्ये बहुतांश वेळा पडद्याआड राहून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी संघटनेत घुसखोरी करण्यापासून ते शीतयुद्धादरम्यान क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रो राजवटीला कमकुवत करण्यापर्यंत ही संस्था त्या वेळच्या आवश्यकतेनुसार राजकीय मुत्सद्दीपणा तसेच कुटिल कारस्थानांचा अवलंब करीत कार्यरत होती. सीआयएबद्दलची सार्वजनिक धारणा खलनायकी ते सनसनाटीपूर्ण कारवाया करणारी गुप्तहेर संस्था अशी राहीली आहे. शिवाय, या समजुतीत हॉलीवुड चित्रपटांनी आणखी भरच टाकली आहे.
हे पुस्तक सीआयएच्या उभारणीचा एक दृष्टीकोन सांगत त्यांनी संपादन केलेले यश, तसेच काही वेळा निर्माण झालेले वादग्रस्त प्रसंग या दोन्हींची मीमांसा करते. अंतर्गत सूत्रे आणि सुरक्षाविषयक धोरणांचे विश्लेषक यांच्या दृष्टीकोनातून या पुस्तकातील घटना आणि पुरावे उलगडले आहेत. हे विश्लेषण किंवा मूल्यमापन सीआयएने त्या वेळच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला दिशा देण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी पडद्यामागून निभावलेल्या मोठ्या भूमिकेवर नवीन प्रकाश टाकते.
Reviews
There are no reviews yet.