धर्म, अर्थ, काम, मोक्ष-देवदत्त पट्टनायक
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
अर्थशास्त्र हे संपत्ती म्हणजेच अन्न निर्माण करण्याशी संबंधित आहे, जे उत्पादन आणि सेवा निर्माण करून केलं जातं. कामशास्त्र म्हणजे त्या अन्नाने आपली भूक भागवणे. आपण इतरांच्या भुकेचा विचार करायला हवा असे धर्मशास्त्र सांगते, तर अलिप्त राहून आणि उदार होऊन आपल्या भुकेला विसरायला मोक्षशास्त्र सांगते. एकत्रितरीत्या ही चार हिंदू शास्त्रे आपल्याला एक चौकट आखून देतात, ज्यात माणसाची कृती, त्याचा हेतू आणि परिणाम ठरवले जाणे शक्य होते. एकत्रितरीत्या ते मानवी अस्तित्व बळकट करून त्याला एक अर्थ देतात.
‘धर्म, अर्थ, काम, मोक्ष’ या पुस्तकात प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक यांनी त्यांच्या पुराणकथांच्या सखोल आकलनातून हिंदूंच्या विचारपद्धतीचं स्पष्ट आणि सहज-सोपं विश्लेषण केले आहे. या लघुनिबंधांतून त्यांनी हिंदूंच्या महत्त्वाच्या संकल्पनांवर खुसखुशीत भाष्य केले आहे.
Reviews
There are no reviews yet.