केजीबी-एन. चोक्कन
Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00.
विसाव्या शतकातील बहुतांश काळ, सोव्हिएत युनियन हे कम्युनिस्ट पक्ष आणि केजीबीसारख्या गुप्तचर सेवांद्वारे संचालित गुप्ततेच्या आणि दडपशाहीच्या लोखंडी पडद्यामागे झाकलेले होते. परदेशातील लोक केजीबीला बाहेरच्या देशांमध्ये पाळत ठेवणारी एक गुप्तहेर संस्था म्हणून ओळखत होते, परंतु सोव्हिएत सीमेच्या आत असलेल्यांनी त्याची व्यापक अशी दडपशाही अनुभवली होती ज्यापासून बाहेरील जग अनभिज्ञ होते.
हे पुस्तक केजीबीचे निघृण हत्या करणारे गट, घुसखोरी कारबाया, प्रक्षोभक घटना, प्रचार आणि परदेशात दुहेरी एजंट्सना पकडण्याचे दस्तऐबजीकरण करते. यासह ते सोव्हिएत सीमांमधील संस्कृती, मीडिया, धर्म आणि दैनंदिन जीवनात असणारा केजीबीचा व्यापक हस्तक्षेप देखील उघड करते. या लिखाणामागील उद्देश केबळ ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणे हा नाही तर केजीबीच्या या गुप्त कारवायांची अंतर्गत कथा सादर करणे व त्यामागील दृष्टिकोन उलगडून सांगणे हा आहे. प्रत्येक गुप्त योजना व कारवाईसह इतिहासाच्या वाटचालीला आकार देत अंधारात राहून काम करणाऱ्यांनी केलेल्या त्यागांचा, प्रेरणांचा आणि विश्वासघाताचा हा शोध आहे.
Reviews
There are no reviews yet.