जुलुमशाहीविषयी-प्रा. टिमथी स्नायडर
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होत नसली तरीही इतिहास आपल्याला खूप काही शिकवू शकतो. विसाव्या शतकात युरोपीयन लोकशाही राष्ट्र कोलमडून गेली आणि नाझीवाद, फाशीवाद तसेच साम्यवादाच्या जुलमी पकडीत सापडली. या साऱ्या चळवळींचे एकेक सर्वेसर्वा नेते होते, आणि ते सारे स्वतःला लोकांचा एकमेव आवाज समजत होते, त्यांचे जागतिक संकटापासून रक्षण करण्याचा दावा करत होते, दंतकथा रचताना विवेकाला पायदळी तुडवत होते. युरोपीय इतिहासातून आपल्याला दिसून येते एक स्पष्ट चित्र – समाज कसे विदीर्ण होत जातात, लोकशाही व्यवस्था कशा ढासळत जातात, आणि सर्वसामान्य लोक अकल्पनीय अशा भीषण परिस्थितीत कसे सापडतात.
इतिहास आपल्याला या साऱ्याची ओळख करून देतो, सावध करतो. विसाव्या शतकात लोकशाही व्यवस्थांचे बळी देऊन जुलूमशाहीला शरण जाणाऱ्या युरोपीय लोकांहून आपण फारसे शहाणे झालेलो नाही. पण राजकीय व्यवस्था पांगळी झालेली असताना निदान आपल्याकडे एकच जमेची बाजू आहे की या काळात आपण जुलुमशाहीची पुढे पडणारी पावले रोखू शकतो.
हीच वेळ आहे.
Reviews
There are no reviews yet.