Previous

अॅटिट्युड-अॅडम अॅश्टन व अॅडम जोन्स

Original price was: ₹199.00.Current price is: ₹180.00.
Next

बुद्ध चरित्र- धर्मानंद कोसंबी

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

द गॉडफादर -मारिओ पुझो

हुकूमशहा, ब्लॅकमेलर, रॅकेटबाज, खुनी ज्याचा प्रभाव अमेरिकन समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचतो. भेटा त्या डॉन कॉर्लिऑनला जो आहे एक दोस्तांचा दोस्त, एक न्यायप्रिय व्यक्ती आणि एक विवेकी माणूस. अमेरिकेतील सिसिलियन माफियाचा सर्वात घातक स्वामी, द गॉडफादर.

पण कोणताही माणूस कायमस्वरूपी शीर्षस्थानी राहू शकत नाही. विशेषतः जेंव्हा त्याचे शत्रू कायद्याच्या दोन्ही बाजूंकडे असतात. आता वय झालेला व्हिटो कार्लिओन आपल्या प्रदीर्घ गुन्हेगारी आयुष्याच्या शेवटापाशी पोहोचत असताना त्याच्या पुत्रांनी परिवाराच्या धंद्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी कंबर कसणे आवश्यक आहे. थोरला सोनी कार्लिओन हा तसा मुरलेला जुना खेळाडू आहे. धाकटा मायकेल कार्लिओन मात्र द्वितीय विश्वयुद्धात लढलेला माजी सैनिक असून गुन्हेगारी जगताशी अनोळखी आणि परिवाराच्या धंद्यात उतरण्यास नाखुश आहे.

धंद्याचे प्रतिस्पर्धी परिवार निर्दयी आहेत. ते आणि पोलीस दोघांनाही रक्ताचा वास आला आहे. जर कार्लिओन परिवारास तगून रहायाचे असेल तर त्याला तितकाच निर्दयी नवा डॉन मिळायला हवा. मात्र गुन्हेगारीच्या हिंसक जगतात यशाची किंमत ही सहनशक्तीच्या फार पलिकडची असू शकते…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द गॉडफादर -मारिओ पुझो”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping