विसरणाऱ्यांना विसरू नका डिमेन्शिया डायरी-डॉ. सिकंदर आडवाणी
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
सध्या स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांची संख्या जगभरासह आपल्या भारतातही वाढत आहे. आकडेवारी सांगते की, ही रुग्णसंख्या भविष्यात लवकरच आयुर्मानामुळे भारतात दुप्पट होईल. आपल्यासाठी ही अत्यंत धोक्याची घंटा असून, डिमेन्शियाबद्दल लोकांमधील माहितीचा अभाव, या आजाराबद्दल नसलेली जनजागृती, आपल्या घरातील वृद्धांना ओझे समजणे ह्या बाबी हा विषय आणखीनच काळजीचा ठरवते. येणाऱ्या काळात अनेक चॅलेंजेस आपल्याला असतील. आणि हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लोकांना डिमेन्शियाची संपूर्ण माहिती असावी, त्याच्याशी लढतांना, आपल्या रुग्णाची काळजी घेताना काय काय करावे? परिस्थिती कशी हाताळावी? डिमेन्शिया होऊ नये म्हणून काय काय करावे, हे एकाच पुस्तकात व तेही मायबोली मराठीत असावे असे वाटले. आपल्या डॉक्टरी पेशात अनुभवाच्या व अनेक तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे रुग्णांसाठी काहीतरी महत्त्वाचे दस्तावेजी काम करावे आणि लोकांना सुपुर्द करावे याच विचारातून या पुस्तकाची पायाभरणी झाली. डिमेन्शियासंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टींना या निमित्ताने विस्ताराने सांगता आले, हे महत्त्वाचे आहे.
कारण या डिमेन्शिया नावाच्या आजारात विसरणारी मंडळी आपल्याला विसरत जरी असली, तरी ‘समाज’ म्हणून आपले उत्तरदायित्व आहे की, आपल्याला विसरणाऱ्यास विसरून चालणार नाही…
Reviews
There are no reviews yet.