यू कॅन तुम्हीही करू शकता – जॉर्ज मॅथ्यू ऍडम्स
Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00.
या पुस्तकातील ही छोटी छोटी प्रकरणे खरं तर तुमच्यासारखीच माझीही मदत व्हावी यासाठीच लिहिली गेली होती. आता तुम्ही ती वाचून माझाच सन्मान वाढविणार आहात. वास्तविक पाहता आपण सगळेच एकमेकांशी निगडित आहोत. त्यामुळे जसं माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे, तसंच तुमच्याकडेही मला देण्यासाठी बरंच काही आहे. या जगातील सर्वांत सोपी गोष्ट म्हणजे यशस्वी होणे. यशस्वी होण्यासाठीचा खेळ खेळताना तुम्ही नियमांचे पालन करीत असाल आणि तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या वरच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीनुसार खेळ न खेळता स्वतःच्या आकलनानुसार हा खेळ खेळणार असाल, तर तुमच्यासाठी यशस्वी होणे नक्कीच सोपे आहे. या लहानसहान भाषणांना मिळालेली प्रेरणा ही शुद्ध मानवी उबदारपणातून आली आहे. या भाषणांमध्ये ही ऊब ओतण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. मला आशा आहे. की हीच ऊब तुम्हालासुद्धा जाणवेल.
Reviews
There are no reviews yet.