
इकेबाना ( Ikebana ) : दत्ता दामोदर नायक
देश- विदेशांतला प्रवास हा आंतरिक आनंद देणारा अनुभव असतो. कालांतराने दुधाचे दही व्हावे त्याप्रमाणे हे अनुभव आंबून त्यांची अनुभूती होते. छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचे किंवा निसर्गाचे जशाचे तसे प्रतिबिंब पडल्याचे दिसते. चित्राची गोष्ट वेगळी आहे. चित्रकार एखादी व्यक्ती किंवा निसर्ग पाहताना आपल्या मनात भावनांचे जे कल्लोळ उसळले त्याचे मिश्रण आपल्या चित्रात करत असतो. या पुस्तकात अंतर्भूत झालेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीत लिहिली आहेत.