
कहाणी मानवप्राण्याची ( Kahani ManavPranyachi ) - नंदा खरे
ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी
तू घडलास कसा?
मूठभर होतास संख्येनं.
लाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास.
दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो लिप्या,
अगणित तंत्र आणि शास्त्र
हे ‘एका’चं ‘अनेक’ होणं - हीच तुझी कहाणी
प्रश्न सोडवत इथपर्यंत आलास.
दर पावलाला नवे प्रश्न उत्पन्न केलेस.
‘माणुसकी’ म्हणजे काय?
‘अमानुषता’ कशात असते?
पदोपदी या प्रश्नांना सामोरा जातो आहेस -
कधी जाणीवपूर्वक, फारदा अजाणताच.
पाहा तर, स्वत:ची कहाणी - उत्तरं शोधायला!
Kahani Manavpranyachi - Nanda khare
कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-93-87667-88-4 |
पुस्तकाची पाने |
420
|
बाईंडिंग |
|