गांधींच्या शोधात जावडेकर ( Gandhinchya Shodhat Javdekar )- राजेश्वरी देशपांडे

  • Rs. 160.00
    Unit price per 
  • Save Rs. 40

Order On WhatsApp

 

राष्ट्रीय चळवळीतील एक बिनीचे कार्यकर्ते असणारे आचार्य शं. द. जावडेकर 'आधुनिक भारत' या बृहद्ग्रंथांचे लेखक म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मराठी समाजाला परिचित होते. ग्रंथलेखन नियतकालिकांमधील लेख, भाषणे, संपादन अशा चतुर्विध मार्गांनी महाराष्ट्रात वैचारिक जागृती घडवण्याचे काम आचार्य जावडेकरांनी जवळपास तीन तपे केले.


'गीतारहस्या'नंतरचा मराठीतील एक थोर ग्रंथ म्हणून जावडेकरांचा 'आधुनिक भारत' हा ग्रंथ ओळखला गेला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या राजकीय इतिहासाची मांडणी करताना या ग्रंथात त्यांनी टिळक आणि गांधी यांच्या राजकारणाची तात्विक सांधेजोड जुळवण्याचा प्रयत्न केला.

भांडवली विषमता आणि अन्याय यांच्या विरोधात सामाजिक क्रांती कशी घडवता येईल,हा नंतरच्या काळात आचार्यांच्या चिंतनाचा मुख्य विषय राहिला. त्या संदर्भात गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचे परस्पर प्रकाशात पुनर्वाचन करून जावडेकरांनी 'सत्याग्रही समाजवाद 'ही नवी विचारसरणी पुढे मांडली. या मांडणीतून गांधीवादाचा एक नवा अन्वयार्थ जावेडकरांनी खुला केला आहे.

गांधींच्या शोधात जावडेकर - राजेश्वरी देशपांडे

Gandhinchya Shodhat Javadekar - Rajeshwari Deshpande

प्रकाशक

 समकालीन प्रकाशन 

ISBN

9789386622648

पुस्तकाची पाने

148

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend