जग बदल घालुनि घाव ( Jag badal ghaluni ghav ) - एकनाथ आव्हाड
एखाद्या गरीब पोतराजाच्या पोराकडून कुणाच्या काय अपेक्षा असणार?
बापासारखं पोतराज व्हावं किंवा जातीची पारंपरिक कामं करत लाचारीनं जगत राहावं.
पण एकनाथ आवाड यांनी ही मळलेली वाट धुडकावली.
घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं.
जगण्याशी लढत आपली वाट आपण शोधली.
पण स्वतःच्या सुखात समाधान मानलं नाही.
आदिवासी नि दलितांना वेठबिगारीतून बाहेर काढलं.
अस्पृश्यता आणि जातीभेद या विरोधात गावोगाव संघर्ष मांडला.
हजारो भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून दिल्या.
त्यांना सेंद्रिय शेती शिकवली. बचत करून छोटे मोठे व्यवसाय करायचा मंत्र दिला.
अन्यायावर घाला घालत नाव जग घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला .
अशा या ध्येयवेडयाची गोष्ट.
प्रकाशक |
समकालीन प्रकाशन |
ISBN |
- |
पुस्तकाची पाने |
211 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |