दारिद्र्याची शोधयात्रा ( Daridryachee Shodhyatra ) -हेरंब कुलकर्णी
खेड्यापाड्यांतली गरीब जनता कशी जगते?
त्यांना दोन वेळच्या खाण्यापुरता पैसा देणारा रोजगार गावांत मिळतो का?
स्थलांतरित मजुरांचं आयुष्य कसं असतं? खेडोपाडी आरोग्य व्यवस्था कशी आहे?
शेतीतले प्रश्न काय आहेत? आत्महत्या का होताहेत?
कायम गावकुसाबाहेर असलेला भटके-विमुक्त समाज कसा जगतो आहे?
दलितांची परिस्थिती काय आहे?
अशा नाना प्रश्नांचा शोध घेत हेरंब कुलकर्णी महाराष्ट्रातल्या गरीब जिल्ह्यांमधल्या गरीब गावांमध्ये फिरले. त्यांना जे दिसलं त्याच्या नोंदी म्हणजे दारिद्य्राची शोधयात्रा हा दस्तावेज. प्रगत महाराष्ट्राच्या ग्रामीण वास्तवाची दुसरी बाजू समोर आणणारा. प्रत्येक सजग वाचकाने डोळ्यांखालून घातलाच पाहिजे असा.
महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन केलेली तळागाळातल्या जनतेची वास्तपुस्त.
प्रकाशक |
समकालीन प्रकाशन |
ISBN |
9789386622624 |
पुस्तकाची पाने |
103 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |