देव-धर्म-माणुसकी यांचा प्रेम-श्रद्धा-मृत्यू या तीन वैश्विक सत्यांच्या आधारे वेध घेण्याचा प्रयत्न करणारी कादंबरी म्हणजे ‘मोघ पुरुस.’
ज्यांना आज ‘देव’ मानलं जातं ती मूळ माणसंच होती आणि आपलं त्यांच्याशी माणुसकीचंच नातं असायला हवं, असा विचार देणारी कादंबरी म्हणजे ‘मोघ पुरुस.’
देव ही संकल्पना स्पष्टपणे मोडीत काढत, देवाच्या नावावर चाललेला धर्माधिष्ठित स्वार्थाचा हिंसाचार आणि द्वेषाचार थांबवण्याचं आव्हान आजच्या माणसाला कसं पेलता येईल यावर उपाय शोधणारी कादंबरी म्हणजे ‘मोघ पुरुस.’
देवा-धर्माच्या अजगरी विळख्यातून सुटण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि महामानवी समूहांचा आश्रय घ्यावा लागेल हे सांगणारी कादंबरी म्हणजे ‘मोघ पुरुस.’
तुमचा देवावर विश्वास असो-नसो, धर्मावर श्रद्धा असो-नसो, माणुसकीचं नातं जर तुम्ही मानत असाल, तर वाचायलाच हवी अशी कादंबरी म्हणजे ‘मोघ पुरुस.’
मोघ पुरूस ( Mogh Purus )- लेखक : प्रतिक पुरी
Publication | विश्वकर्मा प्रकाशन |
---|---|
ISBN |
9789386455321 |
पुस्तकाची पाने |
191 |
बाईंडिंग |
Paperback |