
विवेकाचा आवाज ( Vivekacha Aavaj ) - डॉ नरेंद्र दाभोलकर
विवेकवाद
डॉ. नरेंद्र दाभोलकर
पण जरी ही लढाई मला करता येत नसेल, तरी निदान मी काय करू शकतो?
अंधश्रद्धा निर्मूलनापासून विवेकवादापर्यंत वाटचाल केलेला चळवळीतला एक कार्यकर्ता किंवा एक सजग नागरिक म्हणून मी काय करू शकतो?
मी माझी विवेकबुद्धी प्रखर करू शकतो. माझ्या प्रखर विवेकबुद्धीने मी नवी समतावादी मूल्यं निर्माण करू शकतो आणि माझ्या स्वत:च्या जीवनामध्ये मी त्यांचं आचरण करू शकतो. त्या प्रभावामुळे आजूबाजूच्या कुटुंबांमधल्या व्यक्ती हे करायला लागतील आणि कदाचित समाजामध्येदेखील हा बदल होणं शक्य होईल. म्हणजे व्यापक समाजपरिवर्तन होऊन समाजाचं मूल्यपरिवर्तन कधी होईल ते होईल, परंतु ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मी माझ्या विवेकबुद्धीमधून नव्या प्रमाणमूल्यांच्या निर्मितीचं आचरण सुरू केलं पाहिजे आणि जरी आचार करता आला नाही, तरी मी योग्य मूल्यांचा उच्चार केला पाहिजे.
डॉ.दाभोलकर यांच्या ‘मॅग्नम ओपस’ कंपनीने काढलेल्या दहा ऑडिओ भाषणांचे रूपांतर ‘विवेकाचा आवाज’ या पुस्तकात करण्यात आले आहे. हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून डॉ.दाभोलकरांच्या सहाव्या स्मृतिदिनी 20 ऑगस्ट 2019 रोजी पुणे येथे प्रकाशित करण्यात आले .
Book | विवेकाचा आवाज / Vivekacha Awaz |
---|---|
Author | डॉ नरेंद्र दाभोलकर / Dr Narendra Dabholkar |
Publication | Sadhana Publication |
Language | Marathi |
Category | Social |
Weight |
g |
Pages |
171 |
Binding |
Paperback |