1984- जॉर्ज ऑर्वेल

1984- जॉर्ज ऑर्वेल

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

जॉर्ज ऑर्वेलने भविष्याचं चित्र रेखाटणारी १९८४ ही कादंबरी १९४८मध्ये लिहिली होती.
ही कादंबरी मी २०१९मध्ये वाचली. ऑर्वेलचा जन्म चपारन जिल्ह्यात झाला. मी देखील
त्याच जिल्ह्याचा आहे. पण मला त्याच्या बद्दल २०१९मध्ये अधिक जवळीक वाटते.
कारण कादंबरीच कथानक आणि तपशील आज आपण ज्या जगात जगत आहोत, त्याचं
अचूक प्रतिबिंब आहे, कादंबरीत सर्वत्र टेलिव्हिजनचे पडदे आहेत. जेणेकरून बिगब्रदर
सामान्य नागरिकांवर पाळत ठेवतो. याच पडद्यावरून बातम्याही त्याच वेळी प्रसारित
होतात. हे आपल्याला ओळखीचं झालय. आपले फोन आणि फोनचे स्क्रीन्स आपल्याला
नियंत्रित करण्याची साधनं ठरली आहेत. आपल्याला कशाप्रकारे नियंत्रित केलं जातं आहे
याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कमीत कमी काही शेकडो वृत्तवाहिन्या आज
आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या घोषणा आणि दिल्या जाणाऱ्या बातम्या सारख्याच असतात.
तथाकथित बातम्यांची ही व्यवस्था अहर्निश काम करत असते. जेणेकरून नागरिकाचं
रुपांतर रोबोट वा यंत्रमानवांमध्ये व्हावं.
- रवीश कुमार
पत्रकार, एन.डी.टी.व्ही. इंडिया

'१९८४' ही कादंबरी ऑर्वेलनं १९४८ साली लिहिली. 'अॅनिमल फार्म'प्रमाणे याही
पुस्तकाची अनेक भाषांतरं झाली. भारतीय भाषांपैकी हिंदी आणि मराठीत तरी
झाली आहेतच. इतरही असतील. व्यक्तींच्या एकूण एक अंगांवर नियंत्रण करू
इच्छिणारी आणि असं करू शकणारी राज्यपद्धती... याची नुसती एक झलक म्हणून
सांगतो, की एक पात्र या जगाचं प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर
रोवलेली बुटांची टाच अशी प्रतिमा उभी करतो. हे एक सुटका नसलेलं, हादरवणारं
दुःस्वप्न ऑर्वेलनं उभं केलं आहे.
-नंदा खरे

उत्कंठावर्धक रचना, सरळसोपी भाषाशैली, बोचरा उपरोध आणि वाचून
संपल्यावर अस्वस्थ करणारे कथानक.उपहासिका, भविष्यकथन, राजकीय प्रबंध,
विज्ञान काल्पनिका, गुप्तहेरकथा, मानसिक भयपट, प्रेमकथा अशा अनेक वर्गात
चपखल बसणारी, कोणत्याही काळात आजची वाटणारी कादंबरी....
-वसंत आबाजी डहाके

पुस्तकाचे नाव  1984 
लेखक  जॉर्ज ऑर्वेल  / George Orwell
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

9788194870111

पुस्तकाची पाने 264
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend