आपल्याला काय त्याचं (Aplyala Kay Tyach) ... - श्वेता सीमा विनोद

आपल्याला काय त्याचं (Aplyala Kay Tyach) ... - श्वेता सीमा विनोद

  • Rs. 126.00
    Unit price per 
  • Save Rs. 14
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp


एक तरुणाच्या आतंरिक बदलाची व लिंग समानता कृतीमध्ये आणण्यासाठी
विचारपूर्वक आणि सातत्याने स्वतःला तपासून घेत माणूस बनण्याचा प्रयास
उलगडून दाखवणारी श्वेता सीमा विनोद या तरुण लेखिकची "आपल्याला काय
त्याचं..." हि कादबरी आहे. ग्रामीण भागातील एक तरुण पुण्यात नोकरी करताना
समाजासाठी काही काम करू पाहणाऱ्या "संवाद टीम" मध्ये सामील होतो व आपण
कसे स्त्रीला दुय्यम समजणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे वाहक आहोत याचं त्याला
रुपाली या साफ व सुस्पष्ट विचार करणाऱ्या व सतत प्रश्न विचारणाऱ्या - संवाद
साधणाऱ्या मैत्रिणीमुळे आत्मभान येत आणि तो जे अनुभवतो, पाहतो त्यानं बदलत
जातो. या त्याच्या लिंग निरपेक्ष मनुष्य बनण्याच्या प्रवासाचे उत्कट व वास्तवदर्शी
चित्रण या कादंबरीत कुठेही "प्रीची" न होता सहजतेने आलं आहे. प्रेम, मैत्री, लिंग
समानता, "बॉडी शेमिंग", घरामध्ये वडीलधाऱ्यांनी स्त्री -पुरुष असमानतेचे जेंडर
स्टीरिओटाइपिंग चे पाठ मुलांना पढविणे, ही आज पण असणारी समाजस्थिती.
शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आधुनिक झालेली सावित्रीची लेक
आजच्या काळात समानता मागते, पण शिक्षित असला तरी सहजतेने मिळणारे
पुरुषी प्रिविलेजेस न सोडणारा जोतीबाचा लेक अजूनही बदलायला सहजतेने
तयार होत नाही,हे आजचे एकविसाव्या शतकातलेही वास्तव आहे. त्याला छेद
देणारा एका सच्चा जोतीबाच्या लेकाचा- या कादंबरीचा नायक नितीनचा मनुष्य
बनण्याचा प्रवास बेताने ज्या समर्थपणे चितारला आहे, तो वाचून वाचकांच्या-
खास करून तरुण वाचकांच्या मनात नितीन प्रमाणे मनुष्यपणाचा प्रवास सुरु
करण्याची प्रेरणा निर्माण होईल असा माझा विश्वास आहे! "आपल्याला काय
त्याचं..." पासून "आपल्याला स्वतःपासून बदलत माणूस झालं पाहिजे " हा एक
महत्वाचा विचार समर्पकपणे दिला आहे. स्त्रीवादाच्या कक्षा ओलांडत मनुष्यवादाचा
पुरस्कार करणारा कादंबरीचा हा मानसिक व कृतिशील वैचारिक प्रवास वाचकांना
नक्कीच विचारप्रवण करेल. लेखिकेकडून भविष्यात अशाच चांगल्या
साहित्यकृतीची अपेक्षा बाळगाव्यात असा विश्वास ही कादंबरी देते.
लक्ष्मीकांत देशमुख
(अध्यक्ष : ९१ वे अखिल भारतीय मराठी संमेलन, बडोदे २०१८)

पुस्तकाचे नाव
Aapalyala Kaay Tyaach \आपल्याला काय त्याचं ...
लेखक  Shweta Seema Vinod \श्वेता सीमा विनोद 
प्रकाशक राजगृह प्रकाशन 
ISBN


पुस्तकाची पाने
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend