प्रकाश, अन्न, हवा - अच्युत गोडबोले संच

  • Rs. 750.00
    Unit price per 
  • Save Rs. 150
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp


अच्युत गोडबोले आणि मधुश्री पब्लिकेशन

यांच्या 3 नवीन दर्जेदार पुस्तकांचा संच
मूळ किंमत/- 900
प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत 750 /- घरपोच

कोणत्याही अतिरिक्त कुरियर चार्जेस शिवाय. 

पुस्तकांची नावे
प्रकाश
अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी असायची? ती कशी पेटवली जायची? मेणबत्त्या ते कृत्रिम दिवे (बल्ब) यांचा शोध कसा लागत गेला? हळूहळू प्रकाशाचं विज्ञान कळत गेलं आणि माणसानं आपल्या प्रगतीसाठी प्रकाशाचा वापर करायला सुरुवात केली. त्यातून मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा, फोटोग्राफर्स, टेलिव्हिजन, लेझर आणि फायबर ऑप्टिक्स यांचा जन्म कसा झाला; तसंच मायक्रोस्कोपचा शोध लागल्यावर अनेक सूक्ष्मजंतूंचा शोध कसा लागला आणि त्यानंतर अनेक आजारांची रहस्य कशी उलगडत गेली; हीच बाब टेलिस्कोपच्या बाबतीतही कशी घडली, या सगळ्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक.

अन्न
अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक जगात सगळीकडेच वापरले जातात. या सगळ्यांचा इतिहास प्रत्यक्ष मानवी उत्क्रांतीपासून, मानवी संस्कृतींच्या उदयापासून ते वैज्ञानिक क्रांती आणि हरित क्रांतीपर्यंत घेऊन जातो. अन्नाभोवती फिरणारा हा माणसाचाच इतिहास थक्क करून सोडणारा आहे.

हवा
"माणसानं हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हायजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ,
त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या चुका यांची सुंदर गुंफण म्हणजे 'हवा'!"

लगेच ऑर्डर करा. 


We Also Recommend


Customer Reviews

Based on 1 review Write a review