अद्भुत जैविक विश्व - डॉ. सुनीती धारवाडकर

  • Rs. 135.00
    Unit price per 
  • Save Rs. 15

Order On WhatsApp

मोबाईल असो वा, अपुरी झोप, टेन्शन असो वा प्रदुषित वातावरण ही
सर्व औद्योगिक जीवनशैलीची अपत्ये आहेत. या कृत्रिम जीवनशैलीचे
दुष्परिणाम विशद करायचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
आरोग्यावरिल दुष्परिणाम समजून घेण्याच्या दृष्टीने संबंधित
शरीरयंत्रणांचे कार्य थोडक्यात मांडले आहे. प्रतिकारशक्ती राखण्याचे
महत्त्व करोनासारख्या जैविक संकटाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
विषाणूच्या प्रसारालासुद्धा कारणीभूत असलेली जंगलतोड "आता तरी
थांबवा" असा इशारा निसर्ग आपल्याला देत आहे.
चंगळवाद आणि विकासाच्या भ्रामक संकल्पना आपल्याला
विनाशाकडे नेत आहेत.
आपल्याला मानवतावादी निसर्गस्नेही विकासासाठी समुचित
तंत्रज्ञानाची गरज आहे. अनेक ठिकाणी चालू असलेल्या समुचित
तंत्रज्ञानाचे प्रयोग आपल्याला आशेचा किरण दाखवितात.
या सर्व पैलूंचा विचार या पुस्तकात केला आहे.पुस्तकाचे नाव
अद्भुत जैविक विश्व /Adbhut Jaiwik Vishwa
लेखक 

डॉ. सुनीती धारवाडकर/ Dr. Suniti Dharwadkar 

प्रकाशक

 सौरव प्रकाशन

ISBN

 9788193445167

पुस्तकाची पाने

138

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend