
अल्बर्ट आइन्स्टाईन : जीवनचरित्र (Albert Einstein Biography) - एलिस कॅलाप्राईस आणि ट्रेव्हर लिप्सकोम्ब
अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगाच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून गणला गेला आहे.
बहुतेक लोक आईन्स्टाईनला अलौकिक बुद्धिमतेचे मूर्तिमंत प्रतीक मानतात.
पण आइन्स्टाईन खरोखर कोण होता?
एक व्यक्ती म्हणून तो कसा होता ?
अल्बर्ट आइन्स्टाईनच्या या नव्या चरित्राद्वारे, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांनाही या क्रांतिकारी माणसाचे जीवन आणि विज्ञान यांची संक्षिप्त परंतु सुगम ओळख होईल. आइन्स्टाईनच्या अलौकिक बुद्धीमागे त्याचे सामान्य व्यक्तित्व दडलेले होते. त्यात मानवी दुर्बलता आणि दोष होते; पण जोडीलाच लोकांना आकर्षून घेण्याची शक्ती, विनम्रता, तीव्र विनोदबुद्धी आणि वैशिष्ट्यपूर्ण वागणूक होती.
अल्बर्ट आइन्स्टाईन : जीवनचरित्र या पुस्तकात तेजस्वी, विलक्षण बुद्धिमान वैज्ञानिकाचे जीवन आणि कारकीर्द यांचा संपूर्ण इतिहास समाविष्ट आहे, तो याप्रमाणे:
- त्याचे सुरुवातीचे शिक्षण , शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळावे म्हणून आइन्स्टाईन धडपड, त्यातून 'स्विस पेटंट ऑफिस' मध्ये कारकून म्हणून काम करण्याची वेळ; त्याच काळात त्याचे प्रसिद्ध आणि क्रांतिकारक सिद्धांत तो घडवत होता.
- आइन्स्टाईनची जागतिक कीर्तीशिखरावर मजल; आणि त्या प्रसिद्धीचा सदुपयोग जागतिक शांतेतेसाठी त्याचे प्रयत्न.
-आइन्स्टाईनचे पदार्थविज्ञानातील योगदान.
या पुस्तकात, पुढील वाचनासाठी उपयुक्त दुय्यम महत्वाची संदर्भ -सूची आणि आइन्स्टाईनच्या जीवनातील ठळक दिन-विशेष सांगणारा जीवनपट समाविष्ट आहे.
एलिस कॅलाप्राईस 'प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस' मध्ये २० वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ संपादक होत्या. वैज्ञानिक विषयांचे संपादन हा त्यांचा खास प्रांत होता. 'कलेक्टेड पेपर्स ऑफ अल्बर्ट आइन्स्टाईन' चे संपादन आणि निर्मिती याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर होती. आइन्स्टाईनवरील अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.
ट्रेव्हर लिप्सकोम्ब यांनी प्रथम लंडन विद्यापीठ आणि नंतर ऑक्सफर्डला शिक्षण घेतले. तिथेच 'थिअरेटिकल फिजिक्स ' मध्ये डॉक्टरेट मिळवली. 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'स्टॅटिस्टिकल फिजिक्स ' या आइन्स्टाईनच्या दोन मुख्य आवडत्या विषयांवर लिप्सकोम्ब यांचे विस्तृत लेखन प्रसिद्ध आहे.
या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे, रवींद्र गुर्जर यांनी. .
प्रकाशक |
जायको पब्लिशिंग हाऊस |
---|---|
ISBN |
9788184953510 |
पुस्तकाची पाने | 232 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |