अशक्य भौतिकी ( ASHAKYA BHAUTIKI )- मिचिओ काकू

अशक्य भौतिकी ( ASHAKYA BHAUTIKI )- मिचिओ काकू

  • Rs. 315.00
    Unit price per 
  • Save Rs. 35


आज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – अशक्य भौतिकी.

हे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे.

पहिला भाग आहे, क्लास-१ अशक्यता. ज्यात टेलिपोर्टेशन, अँटिमॅटर इंजिन्स, काही प्रकारची टेलिपथी, सायकोकायनेसिस आणि अदृश्यता यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही.

दुसरा भाग आहे क्लास-२ अशक्यता. ज्यात टाइम मशीन, हायपर स्पेस ट्रॅव्हलची शक्यता आणि कृमिविवरातून प्रवास यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे.

तिसरा आणि शेवटचा भाग आहे, क्लास-३ अशक्यता. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.

प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9789353172602

पुस्तकाची पाने 316
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend