
अॅटलास श्रग्ड (Atlas Shrugged) - आयन रॅड, अनुवाद :- मुग्धा कर्णिक
तो म्हणाला होता, की तो जगाचा व्यवहार थांबवेल - आणि त्यानं ते केलंही !
पण जगाचा व्यवहार थांबवणारा हा संहारकर्ता होता की मुक्तिदाता?
तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते पूर्णार्थाने जगणं हेच पुण्यकर्म आहे.
प्रश्न जगायचं की नाही याबाबतचा नसून विचार करायचा की नाही असा आहे.
माणसाच्या शारीर अस्तित्वापेक्षा त्याच्या बुद्धीचे अस्तित्व हीच त्याची ओळख असते. - बुद्धीला कमी लेखणार्या, बुद्धीचा अधिक्षेप करणार्या, अन्याय करणार्या जगाविरुद्ध उसळून उठून स्फुरलेली ही कादंबरी आयन रँडने विविध क्षेत्रांवर संशोधन करून आपल्या तत्त्वज्ञानाची धार अधिकाधिक तीव्र करीत लिहिली आहे.
स्वत:च्या बुद्धीवर, सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्वास बाळगणार्या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्कविश्वात घेऊन जाते.
प्रकाशक | डायमंड पब्लिकेशन |
---|---|
ISBN |
9788184833508 |
पुस्तकाची पाने | 1294 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |