
चीन-वेगळ्या झरोक्यातून ( Chin-Vegalya Jharokyatun ) - डॉ. अंजली सोमण
भारतीय माणसाला चीनबद्दल नेहमी आकर्षण वाटते. चीनच्या तीव्र गतीने होणाऱ्या
विकासाच्या बातम्या सतत त्याच्यापर्यंत येत असतात. इथून तिथे गेलेल्या टुरिस्टांना
चीनमधील उत्तुंग ठिकाणे आणि प्रगतीच दाखवली जाते.
''चीन-वेगळ्या झरोक्यातून' हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते.
समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहित नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन, समाजकारण -राजकारण यांचा फेरफटका घडवते.
डॉ. अंजली सोमण यांच्या लालित्यपुर्ण शैलीमुळे पुस्तकातील विवेचन रोचक आणि वाचनीय झाले आहे. त्यामुळे ते वाचकप्रिय होईल. विकासासाठी 'लोकशाही की हुकूमशाही ' हा संभ्रम अनेकनाच्या मनात घर करून असतो. हे पुस्तक वाचून तो दूर होईल. एखाद्या देशाची ओळख कशी करून घ्यावी याचा हा उत्तम नमुना आहे.
Publication | प्रफुल्लता प्रकाशन |
---|---|
ISBN | 9788193829356 |
पुस्तकाची पाने |
152 |
बाईंडिंग |
Paperback |