दलपतसिंग येती गावा ( Dalpatsing Yeti Gaava ) नाट्य निर्मिती प्रक्रिया व नाट्यसंहिता
दलपतसिंग येती गावा नाट्य निर्मिती प्रक्रिया व नाट्यसंहिता
दलपतसिंग येती गावा नाट्य निर्मिती प्रक्रिया
विनोद शिरसाठ
या पुस्तकात 'दलपतसिंग येती गावा' या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे,
बहुतेक सर्वजण सांगत आहे ते या नाटकाच्या निर्मतीप्रक्रियेविषयी, अरुण रॉय
यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर- शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या
स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात
दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची
गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात - आठ
महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे
नाटक उभे केले, त्याची हकीगत म्हणजे हे पुस्तक आहे. अरुणा रॉय यांना
शंकरसिंग आणि निखिल डे या दोन सहकाऱ्यांची ज्या पद्धतीची खंबीर साथ मिळाली,
तशीच साथ अतुल पेठे यांना राजकुमार तांगडे (दलपतसिंग) आणि
संभाजी तांगडे (शाहीर) यांची मिळाली आहे. अरुण रॉय आणि अतुल पेठे यांच्यातील
या खूपच मर्यादित अर्थाने पण महत्वाच्या अशा साम्यस्थळांबरोबरच
इतरही काही साम्यस्थळे अरुण रॉयचा लढा आणि अतुल पेठेंचा प्रकल्प
यांत पाहायला मिळतील. त्यामुळे हे पुस्तक वाचून कोणालाही
'दलपतसिंग येती गावा' हे नाटक पाहण्याची आणि अरुण रॉय यांच्या कार्याबद्दल जाणून
घेण्याची तीव्र इच्छा होईल; किंबहुना तसे केल्याशिवाय या पुस्तकाची खुमारी आणि मोल नीट कळणार नाही.
दलपतसिंग येती गावा नाट्यसंहिता
- मकरंद साठे, अतुल पेठे, राजकुमार तांगडे
एका अर्थाने हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे,
पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य
होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही
नाटक, मग ते प्रचार नाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी
मानवी भाव- भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक
असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही
भिडलं पाहिजे. या भावनांना भिडण्यातून अनेकदा ते भावनोत्कट
ना होता विचारोन्मुखता आली पाहिजे. तो अनुभव स्वतःचा
आहे इतक्या जिवंत पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न होता.
हा प्रयत्न मूळ सिनेमात होता आणि या नाटकातही आहे, पण
तो किती यशस्वी झाला हे प्रेक्षकांनी ठरवावे.
Book |
दलपतसिंग येती गावा नाट्य निर्मिती प्रक्रिया व नाट्यसंहिता
|
Author |
मकरंद साठे, अतुल पेठे, राजकुमार तांगडे
|
Publication |
Sadhana Publication
|
Language | Marathi |
Pages | 406 |
Binding | Paperback |