डायनासोरचे वंशज (Dinosaurche Vanshaj) -दीनानाथ मनोहर
दिनानाथ मनोहर यांच्या विज्ञानकथा आपण आजवर
न कल्पिलेल्या शक्यतांचा मागोवा घेतात.
भविष्यातल्या, वर्तमानातल्याही अन् भूतकाळातल्याही.
पण त्या तेवढ्यावरच थांबत नाहीत.
या कथांचं मर्म विज्ञान असलं तरी त्या माणसांभोवती फिरतात.
माणसाच्या मनात दडलेल्या भावभावनांना हात घालतात.
जगात शास्त्रीय संशोधनांचा स्फोट होत असताना
त्यात मानवी जीवनाचं नेमकं महत्त्व काय,
हा प्रश्न आपल्यासमोर ठेवतात.
विचारप्रवृत्त करतात. अंतर्मुख बनवतात.
त्यांच्या कथांमधल्या पात्रांच्या सोबतीने आपणही
एका वेगळ्या जगाचे प्रवासी बनण्याचा आनंद मिळवू शकतो.
प्रकाशक |
समकालीन प्रकाशन |
लेखक | दीनानाथ मनोहर |
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
184 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |