ज्ञानाचा प्रवाहो चालिला - डॉ. सुनीती धारवाडकर आणि डॉ. नितीन हांडे

ज्ञानाचा प्रवाहो चालिला - डॉ. सुनीती धारवाडकर आणि डॉ. नितीन हांडे

  • Rs. 153.00
    Unit price per 
  • Save Rs. 17


प्रकाशन पूर्व नोंदणी 

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आजपर्यंत अनेक आजारांवर लसी विकसित केल्या, औषधे शोधून काढली. देवी, क्षय, कॉलरा यांसारख्या अनेक जीवघेण्या रोगांपासून मुक्तता मिळविली. आज संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोव्हिड आजारावर अत्यंत कमी वेळात विविध लसी निर्माण करण्याचे श्रेय मानवतावादी विज्ञानालाच जाते.
ज्ञानाचा हा प्रवाह असाच चालू राहणार आहे.
प्रस्तुत पुस्तकातून विज्ञान कसे विकसित होते, नवे आयाम कसे जोडले जातात, शेवटी कोडी कशी उलगडली जातात, याचा वेध घेतला आहे.जीवविज्ञानाचे क्षेत्र कसे विस्तारत गेले, त्याचा प्रवास आज कोणत्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचला आहे, याची झलक यातून पहायला मिळते. या प्रवासातील काही थांब्यावर वाचकाच्यासमोर प्रतिभावंत जीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान यांची भेट होते।
आमची माती, आमचे शास्त्रज्ञ :
*मायबोलीत विज्ञान आणणारे-डॉ.जयंत नारळीकर
*ध्येयासक्तीचे मूर्तिमंत उदाहरण - डॉ.कमला सोहनी
* जीवरेणूंचे दर्शन घडविणाऱ्या डॉ .दर्शन रंगनाथन.
विज्ञानाची संजीवनी :
रोगनिवारणात योगदान : कोव्हिडवरील लसी
*रोगजंतू वर विजय -डॉ. एडवर्ड जेन्नर
*बहुगुणी संशोधन -डॉ. लुई पाश्चर ,
* पोलिओवर मात -डॉ. जोनास साक .
* नाट्यमय शोध -डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग
* प्रस्फूटीत ज्ञानकिरणे - डॉ . डोरोथी हाँजकीन
* पेनिसिलिनचे वरदान - डॉ.बार्बरा लोव्ह.
*आधुनिक लसी : कोव्हिडशी सामना .
* उत्क्रांतीचा मागोवा : चार्ल्स डार्विन.
जनुकीय अंतरंग उलगडणारा मनोरंजक शोध- प्रवास :
डॉ. रोझलिंड फ्रँकलिन,
डॉ. बार्बरा मॅकक्लिंटन, डॉ. हरगोविंद खुराना,
डॉ. वेंकटरमन रामकृष्णन आणि डॉ. जेनिफर डॉडना
प्रस्तुत पुस्तकातून या संशोधकांची व त्यांच्या संशोधनाची माहिती देत या शोध- प्रवासाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज करोनाच्या संकटाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे की विज्ञान - तंत्रज्ञानाचा उपयोग हा लोकांच्या कल्याणसाठी व निसर्ग संवर्धनासाठी व्हायला हवा . निसर्गस्नेही व लोकाभिमुख विज्ञान-तंत्रज्ञानच मानवजातीला वाचवू शकेल !पुस्तकाचे नाव
ज्ञानाचा प्रवाहो चालिला
लेखक 

डॉ. सुनीती धारवाडकर/डॉ. नितीन हांडे Dr. Suniti Dharwadkar /Dr. Nitin Hande

प्रकाशक

 सौरव प्रकाशन

ISBN

 -

पुस्तकाची पाने

-

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend