
एकाकी - सुरेश द्वादशीवार (Ekaki-Suresh Dwadashiwar)
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो. यावर उपाय सांगणारे शास्त्र कोणते? मानसशास्त्र, धर्मशास्त्र, लहरीपण की एकाकीपणा समझौता करण्याची मानसिकता? एक प्रकार याहून वाईट व दुःखद आहे. दीर्घ काळ आजारी असलेली, फार काळ वृद्धत्व जगणारी किंवा कधी काळी वाट्याला आलेले वैधव्य वा विधुरपण सांभाळणारीही माणसे असतात. त्यांच्या एकाकी कळांची कल्पना कशी करायची? की, तो समाजाचा विषयच नव्हे ?
Book | एकाकी / Ekaki |
---|---|
Author | सुरेश द्वादशीवार / Suresh Dwadashiwar |
Publication | Sadhana Publication |
Language | Marathi |
Pages |
112 |
Binding |
Paperback |