ग गणिताचा गणितातील गमती ( G Ganitacha Ganitatil Gamati ) - अरविंद गुप्ता
अशी एक म्हण आहे की, 'कौशल्ये शिकवता येतात, पण
संकल्पना मात्र स्वतःच समजून घ्याव्या लागतात.'
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना
संकल्पना समजत नाहीत. त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या,
गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमांतून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो.
समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातून ते गणित शिकतात.
या पुस्तकात गणित तज्ज्ञांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत,
ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समज पक्की होईल.
पुस्तकाचे लेखक अरविंद गुप्ता विज्ञान प्रसारक व नवनवीन खेळण्यांचे संशोधक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. ते स्वतः IIT कानपूरच्या माजी विद्यार्थी असून त्यांनी टेल्को सारख्या नामांकित कंपनीत कामही केले आहे. पण पुढे त्यांनी आपले सर्व लक्ष मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकडे केंद्रित केले. २०१८ साली भारत सरकारने त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानीत केले.
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
9789383850372 |
पुस्तकाची पाने | 124 |
बाईंडिंग |
Paperback |