
गांधी का मरत नाही ( Gandhi Ka Marat Nahi ) - चंद्रकांत वानखडे
2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधी जन्माला 150 वर्ष
पूर्ण झाली. गांधींच्या मृत्यूलाही 70 वर्षे होऊन गेली, तरीही गांधी अजूनही जिवंत आहेत असं वाटत राहतं. गांधींच्या मृत्यूनंतर विनोबांना विचारलं गेलं,
‘गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांत प्रथम कोणता विचार तुमच्या मनात आला?’ त्यावर उत्तर देताना विनोबा म्हणाले, “माझ्या मनाला असेच वाटले की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात हाच विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत,
ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.’’
म्हणूनच मग प्रश्न पडतो, ‘गांधी का मरत नाही’
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-81-943491-0-5 |
पुस्तकाची पाने | 168 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |