हसण्यावारी नेऊ नका - उन्नमती श्याम सुंदर

हसण्यावारी नेऊ नका - उन्नमती श्याम सुंदर

  • Rs. 360.00
    Unit price per 
  • Save Rs. 40


1932–1956 गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं १९४९ सालचं व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं, त्यावरून २०१२ साली बराच गदारोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णांनी या निषेधाचा प्रतिकार केला. त्यानंतर अभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमती श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रांमधील आंबेडकरांवरच्या व्यंगचित्रांचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली. या प्रयत्नातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांचं एक संकलन तयार झालं. शंकर, अन्वर अहमद व आर. के. लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रं आहेत. आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं. ........

भारतीय राजकीय व्यंगचित्रकलेचं दयामाया न दाखवणारं कठोर पुनर्मूल्यमापन या पुस्तकात केलं आहे.

- सुरज येंगडे,

प्रस्तावनेमधून ‘कलात्मक स्वातंत्र्या’चं सोंग घेणाऱ्या उच्चजातीय बहुसंख्याकवादाचा मुखवटा श्याम सुंदर फाडतात.

- राज्यश्री गूडी,

दृश्य कलाकार हसण्यावारी नेऊ नका मधून घाणेरडी सवर्ण दृष्टी आपल्या समोर येते आणि आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.

- वरुण ग्रोव्हर, विनोदकार व पटकथालेखक

 We Also Recommend