
हेन्री डेव्हिड थोरो चरित्र आणि निबंध
मेमेंटो मोरी...
मृत्यू अटळ आहे. मला तर वाटते, अमेरिकेत अजून तरी एकही माणूस मृत्यू पावलेला नाही.
कारण मृत्यूसाठी अगोदर जगावे लागते. माझा शववाहिकांवर, कफनांवर आणि अंत्यविधींवर
विश्वास बसणे कठीण आहे. कारण ही माणसे खऱ्या अर्थाने जगलीच नाहीत. ही माणसे
शेणाच्या खतासारखी या जगात हळूहळू कुजत गेली आहेत. यांच्या थडग्यासाठी मानाची
जागाही नाही... कुठेतरी खड्डा खणलाय बस्स..! मी बऱ्याच जणांना ते मरणार आहेत असे
ढोंग करताना पाहतो किंवा ते मेले आहेत, असेही ऐकतो. शक्यच नाही! मी त्यांना आव्हान
देतो, त्यांनी मरून दाखवावे. मरायला ते जिवंतच नाहीत, तर मरणार कुठून? मी सांगतो हे
असेच कुजत राहतील आणि आपल्याला त्यांच्या जागा साफ करण्याचे काम लावून जातील.
माझ्या दृष्टीने जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत फक्त सहा-सात लोक मेले असतील. 'मेमेंटो
मोरी' म्हणजे 'प्रत्येकाला मेलेच पाहिजे' या अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा खरा अर्थ
आपल्याला अजून कळलेलाच नाही...
प्रेम...
मला तर असे वाटते की, तिला काहीही न सांगता सगळे समजले पाहिजे. मी माझ्या
प्रेयसीपासून दूर झालो, कारण मला तिला एक गोष्ट सांगावी लागली होती. त्यावर तिने मला
प्रश्न विचारले. खरे तर तिला ते समजायला हवे होते. माझे तिच्यावर प्रेम आहे हे मला सांगावे
लागले, हाच आमच्यातील फरक होता. त्यालाच दुसऱ्या शब्दात म्हणतात, 'गैरसमज'.
महात्मा गांधी आणि थोरो
महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला, त्यात ते म्हणाले, 'माझ्या
अमेरिकन मित्रांनो! अमेरिकेने मला थोरोंच्या रूपाने एक गुरू दिला आहे. मी जो लढा
उभारला आहे, त्याचे ठाम व वैचारिक पुष्टीकरण मला थोरो यांच्या 'ड्यूटी ऑफ सिव्हिल
डिसओबिडिअन्स' या निबंधात मिळाले आणि मी दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होतो, ते
काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे...'
पुस्तकाचे नाव | हेन्री डेव्हिड थोरो चरित्र आणि निबंध |
---|---|
लेखक | हेन्री डेव्हिड थोरो / Henry David Thoreau |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
|
पुस्तकाची पाने | 260 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |