
इंडिका - भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास - प्रणय लाल, अनुवाद - नंदा खरे
जीवरसायन तज्ज्ञ् प्रणय लाल यांचे Indica: A Deep Natural History of the Indian Subcontinent हे इंग्रजी पुस्तक बरेच गाजले. या पुस्तकात त्यांनी पृथ्वी निर्माण झाल्यापासूनचा भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास हा अश्या पद्धतीने मांडला आहे की तो वैज्ञानिक वाचन करणाऱ्यां इतकाच न करणाऱ्यांनाही भावतो. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे तो प्रसिद्ध कादंबरीकार नंदा खरे यांनी. त्यामुळे तो अधिकच रंगतदार झाला आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे यातील चित्रे, पुस्तकाचा विषय ती प्रभावीपणे वाचकापर्यंत पोचवतात.
पुस्तकाचे नाव | इंडिका - भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास /Indica: A Deep Natural History of the Indian Subcontinent |
प्रकाशक |
मधुश्री पब्लिकेशन /Madhushree Publication |
लेखक | प्रणय लाल /Pranay Lal |
अनुवाद | नंदा खरे / Nanda Khare |
ISBN |
9788194129844 |
पुस्तकाची पाने |
392 |
बाईंडिंग |
हार्डकवर |