इन्किलाब विरुद्ध जिहाद ( Inqilab Viruddha Jihad ) - लक्ष्मीकांत देशमुख

इन्किलाब विरुद्ध जिहाद ( Inqilab Viruddha Jihad ) - लक्ष्मीकांत देशमुख

  • Rs. 720.00
    Unit price per 
  • Save Rs. 80
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही खऱ्या अर्थाने मराठीमधली एक
महाकादंबरी आहे.
ज्या अफगाणिस्तानात निर्नायकी व रक्तलांच्छित संघर्ष
अनेक दशके चालू आहे, जिथं धार्मिक मूलतत्त्ववाद व विध्वंस हा
परवलीचा शब्द बनला आहे; अशा देशात डावीकडे झुकणारा
क्रांतीचा इन्किलाबचा--जिहादी प्रवृत्तीनं धर्म व दहशतवादाच्या
कॉकटेलनं कसा पराभव केला आणि देशाला अक्षरशः कसं
तमोयुगात नेलं... असा देश व समाजाचं चित्रण या कादंबरीत
समग्रपणे रेखाटलं आहे.
देशमुखांनी कादंबरीपटावर हा पूर्ण देश घेतला. त्याची
शेजारी राष्ट्र कोणती, हे मांडलं. राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक
व धार्मिक सांस्कृतिक हे त्याचे स्तर तपासले. राजकीय
घटनाचित्रणात लेखकाला फारसे स्वातंत्र्य मिळत नसते. याचे भान
ठेवून लेखकाने त्याचा वास्तव सत्य म्हणून उपयोग करीत
त्याभोवती सामाजिक र सांस्कृतिक अंगाने Fiction ललित निर्माण
केले आहे. हा अपूर्व प्रयोग आहे.
भाषेला बाज, भाष्यातील नेमकेपणा तिथला माहोल निर्माण
करणार चतुर संवादलेखन, रसपूर्ण प्रसंगमालिका, कथानकाचा
विस्तृत पट चिंतनशीलता आणि धर्म राजकीय तत्वज्ञान चर्चा
यामुळे ही कादंबरी केवळ मोठीच नाही, तर सहयात्री ठरते.
जागतिक दर्जाची खरीखुरी आंतरराष्ट्रीय मराठी कादंबरी...
हा या कादंबरीचा युनिक सेलिंग पॉईंट आहे.

पुस्तक  इन्किलाब विरुद्ध जिहाद/ Inqlaab viruddh jihad 
लेखक  लक्ष्मीकांत देशमुख / Laxmikant Deshmukh
Weight 715g
ISBN

 9789351171157

पुस्तकाची पाने

636

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend