करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस (Karnyache Divas, Kalnyache Divas ) - डॉ. आनंद नाडकर्णी

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस (Karnyache Divas, Kalnyache Divas ) - डॉ. आनंद नाडकर्णी

 • Rs. 144.00
  Unit price per 
 • Save Rs. 16
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

कसोटीच्या कालखंडाला कसं सामोरं जायचं ह्या विषयावर मी जसा वागत

होतो तसाच बोलत होतो... ते पुस्तकी नव्हतं. विवेकनिष्ठ माणूस म्हणून

मानसोपचारतज्ज्ञ आणि अद्वैत तत्त्वज्ञान ह्या दोहोंमधली माझी समज

विस्तारणारं होतं. शिवाय, माझं माणूस म्हणूनचं जगणं आणि मनआरोग्य प्रसारक

म्हणून माझं उद्दिष्ट ही दोन्ही अगदी एकजीव झाल्याचा अनुभव मला यायला लागला.

आता पुढे तुमच्या भेटीला येणारे सारेच लेख तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे

आधीच वाचले, ऐकले, पाहिले, अनुभवले असण्याची शक्यता आहे. पण

आता हा त्यांचा एकत्रित असा गुच्छ आहे. ह्यामध्ये कोरोनाच्या कालखंडाचे

वैयक्तिक, सामाजिक, भावनिक असे दस्तऐवजीकरण तर आहेच; पण

त्याचबरोबर ह्या पालक खंडातून जाताना नेमकं काय शिकायचं आणि पुढे काय

न्यायचं ह्याचं भरीव सूचनही आहे. आजूबाजूची अनिश्‍चितता काही रातोरात

संपणार नाही हे आपल्याला कळून चुकलं आहे. अशा संक्रमणकाळातून

जाताना स्वतःच्या विचारभावनांचं आरोग्य कसं जपायचं ह्यासाठी एक ‘गाईड’

म्हणूनही हे पुस्तक उपयोगाचं आहे आणि ह्या सार्‍यातून पार पडल्यावर उद्याच्या

पिढीला कोरोनाची गोष्ट सांगण्यासाठीसुद्धा हे लिखाण उपयुक्त ठरणारं आहे.


  पुस्तक  करण्याचे दिवसकळण्याचे दिवस / Karnyache Divas, Kalnyache Divas
  लेखक 

  डॉआनंद नाडकर्णी / Dr. Anand Nadkarni 

  प्रकाशक मनोविकास प्रकाशन
  ISBN

  978-93-90060-16-0

  पुस्तकाची पाने 156
  बाईंडिंग

  पेपरबॅक 


  We Also Recommend