केशवराव जेधे -य. दि. फडके

केशवराव जेधे -य. दि. फडके

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांचा
बहुजनांच्या उद्धाराचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि १९१९ ते १९५९ हा चाळीस वर्षांचा कालखंड
आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरशः गाजवणारे बहुजनांचे नेते देशभक्त केशवराव जेधे यांचे अत्यंत
निःस्पृहपणे लिहिलेले हे जीवनचरित्र. या पुस्तकात केशवराव जेधे या लोकनेत्याची राजकीय-सामाजिक
जडणघडण, ब्राह्मणेतर चळवळीतील त्यांचे नेतृत्व, पुरोगामी विचारांची त्यांनी धरलेली कास आणि
त्यासाठी केलेला अविरत संघर्ष यांचे तर दर्शन घडतेच, शिवाय महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी
आणि शिवस्मारकासाटी केशवरावांनी सभागृहात उभे केलेले तंटेबखेडे; सामाजिक जीवनात उभी केलेली
चळवळ आणि प्रस्थापित सनातनी नेतृत्वाला आव्हान देत बहुजनांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी
दिलेला लढाही वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. शेतकरी-कष्टकरी वर्गासाठी केशवरावांनी केलेल्या
संघटनकार्याचे आणि खेडोपाड्यात काँग्रेस पक्ष रुजवताना त्यांना घ्याव्या लागलेल्या कठोर मेहनतीचे
चित्रही आपल्या समोर उभे राहते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचे अस्पृश्यता निवारण कार्य, डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, महात्मा गांधींचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा
मुक्तिसंग्राम अशा आत्यंतिक महत्त्वाच्या घटनांतील केशवरावांची मौलिक भूमिकाही स्पष्ट होते; तर
ब्राह्मणेतर पक्ष ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शेकाप मग पुन्हा काँग्रेस या केशवरावांच्या राजकीय प्रवासात
आपणही सहभागी होतो. हे पुस्तक म्हणजे एका देशभक्ताच्या जीवनकार्याचा तटस्थपणे घेतलेला वेध आहे.
य. दि. फडके (३ जानेवारी, १९३१ ते ११ जानेवारी, २००८) हे मराठी साहित्य क्षेत्रातील
महत्त्वाचे चरित्रकार आणि अभ्यासक होते. साक्षेपी लेखक, संपादक आणि संशोधक म्हणून ते
सर्वपरिचित होते. 'विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९४७)' हा त्यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा
राजकीय इतिहास अभ्यासकांना, संशोधकांना दिशादर्शक ठरणारा आहे. फडकेंचे लेखन अस्सल
दस्तऐवजावर आधारलेले, ठाम, ठाशीव आणि नेमके आहे. त्यांनी अनेक राजकीय चरित्र लिहिली
असून, २००० साली बेळगाव येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पुस्तकाचे नाव
 केशवराव जेधे/ Keshavrao Jedhe
लेखक
य. दि. फडके / Y D Fadke
प्रकाशक
मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

पुस्तकाची पाने

बाईंडिंग
पेपरबॅक 

We Also Recommend


Customer Reviews

Based on 1 review Write a review