खरेखुरे आयडॉल्स ( Kharekhure Idols)
मागील काही वर्षांमध्ये विविध टीव्ही चॅनेल्सवर 'टॅलेन्ट सर्च ' ला वाहिलेल्या स्पर्धांची अक्षरशः ढगफुटी झाली होती. 'इंडियन आयडॉल ' नावाचा कार्यक्रम त्यातल्या त्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरला. कलेची जोपासना, नवीन कलाकारांना संधी वगैरे दावे आयोजकांकडून होत असले, तरी मूळ उद्देश चॅनेल व उत्पादकांना प्रचंड प्रसिद्धी देणे हाच होता. या कार्यक्रमातील 'नक्कली ' गायकांनाच 'आयडॉल' म्हणून समाजापुढे आणले गेले, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या गेल्यात.
या साऱ्यावर मार्मिक टिपण्णी करण्यासाठी 'खरेखुरे आयडॉल्स' ही कल्पना राबिवली गेली. या टिप्पणीमध्ये दोन अर्थ अनुस्युत होते. एक, ज्यांना आयडॉल म्हणून मिरवलं जात आहे ते 'खरेखुरे ' नाहीत आणि दोन, मनोरंजन करणाऱ्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा तळातल्या माणसासाठी जे लोक काम करतात, त्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 'खरे खुरे' आयडॉल्स कुणी असतील तर हे लोक आहेत!
या लोकांनी जे काम चालवले आहे ते लोकांच्या भल्यासाठी आहे. त्यांच्या कामांमधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे चांगले पायंडे पडत आहे, कुठे स्थानिक बुद्धी -शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे. या माणसांच्या कामामुळे आपल्या व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होत आहे.
या खऱ्याखुऱ्या आयडॉल्सनीं एकीकडे जागरूकता तयार करणं आणि दुसरीकडे योजनांवर प्रभाव पाडण्यासाठी अभ्यास -संशोधन करून स्वतःचा सहभाग वाढवणं आणि वेळप्रसंगी संघर्ष करणं असे सर्व उपाय केले . या उपायांतून कधी एखाद्या गावाचा कायापालट झाला , तर कधी त्याहून अधिक व्यापक परिणाम साधला गेला. अश्या खऱ्याखुऱ्या आयडॉल्सची अनेक उदाहरणं या पुस्तकात वाचायला मिळतील.
प्रकाशक |
समकालीन प्रकाशन |
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
199 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |