खरेखुरे आयडॉल्स 3( Kharekhure Idols 3)

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

‘खरेखुरे आयडॉल्स’ या मालिकेतलं हे तिसरं पुस्तक. ज्यांच्या कामामधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे, कुठे त्यांच्या कामामुळे व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होऊन व्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे, ते खरे समाजाचे आयडॉल्स. त्यांची नोंद घेण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. महाराष्ट्राच्या सर्व भौगोलिक विभागांतील व जास्तीत जास्त सामाजिक गटांतील मंडळींचा यात समावेश असावा, असा आमचा प्रयत्न राहिला आहे. आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत. त्यातली काही नावं लोकांना ऐकून माहिती आहेत, पण त्यांच्या कामाच्या तपशीलाची कल्पना नाही; तर काहींच्या कामाची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही. अशा २० व्यक्तींचा या पुस्तकात समावेश आहे. यातील काही व्यक्ती संघर्षात्मक कामात गुंतलेल्या आहेत, काहींनी रचनात्मक कामं उभारली आहेत; तर काही जण समाजाच्या गरजेनुसार दोन्ही मार्ग अवलंबून प्रवास करत आहेत. कोण आहेत हे खरेखुरे आयडॉल्स?

पुस्तकाचे नाव  खरेखुरे आयडॉल्स 3

प्रकाशक

समकालीन प्रकाशन 

ISBN

 9788195238163

पुस्तकाची पाने

198

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend