महानतेच्या दिशेने २ ( Mahantechya Dishene 2 ) -रॉबिन शर्मा

महानतेच्या दिशेने २ ( Mahantechya Dishene 2 ) -रॉबिन शर्मा

  • Rs. 158.00
    Unit price per 
  • Save Rs. 17
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

महानतेच्या दिशेने जाणारी ही पाऊल वाट या दुस-या भागात अधिक विस्तारशील व व्यापक होताना तुम्हाला दिसेल. रॉबीनची विश्वव्यापक जीवनदॄष्टी तुम्हाला सामान्यत्त्वाच्या दलदलीतून बाहेर काढत असामान्यत्वाकडे, सर्वेत्कॄष्टतेकडे तसेच एका सौंदर्यशील वैभवशिखराकडे सहज घेऊन जाईल. हे लेख आनंदयी व उदबोधक तर आहेतच पण तुमच्या व्यावसायिक व वैयक्तिक विकासास सर्वतोपरी (अगदी पावला पावलांवर) सहाय्यभूत ठरणारे आहेत.

-जागतिक स्तरांवर वैभवशाली कार्य-जीवन जगण्यासाठी

-सॄजनशील व स्वार्थाने यशस्वी होण्यासाठी

-प्रेरकता, प्रभावी-परिणामकारकता तसेच आंतरबाहय उत्साहशीलतेसाठी

जीवनात ख-या अर्थाने आनंदी व सुखमय जीवन प्राप्त करण्यासाठी

प्रतिकूल व स्वार्थाने बिकट प्रवासास धैर्यशीलतेने सामोरे जाण्यासाठी

- आपले व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवन सुलभ करण्यासाठी

महानतेच्या दिशेने- २ मध्ये काही नव्या जीवनदॄष्टीणे आणि आशयदॄष्टया सखोल असे लेख आहेत, जे तुम्हाला सार्वाधिक प्रेरक तर ठरतीलच पण रॉबीनची विचारसूत्रे तुम्हाला यशशिखरापर्यंत सदैव साथ-सोबत करतील. इतका चांगला परफॉर्मन्स दया की लोकांना तुमची सखल घ्यावीच लागेल, अबोल-तत्पर चांगुलपणा, कामावरची पकड प्रथम मजबूत करा, संवेदनशील समजूतदारपणा तसेच कमालीच्या उत्साहात जीवन जगा हे रॉबीनचे नवे लेख तुमचे अवघे आयुष्य व जीवनाकडे पाहण्याची दॄष्टी बदलून टाकतील.

विकास-वैभवाचा परिपक्क टप्पा गाठत एक परिपूर्ण सौंदर्यशील जीवन जगण्यासाठी रॉबीनची १०१ दिशा सूत्रे तुम्हाला अनेक दिशांनी व दॄष्टींनी विकासोन्मुख करतील. प्रेरकता व प्रभावशील परिणामकारकतेसह झालेले आकलन आजच अंमलात आणा आणि मग बघा चमत्कार. जागतिक स्तरांवर वैभवशाली यशसंपन्न जीवनास आजच प्रारंभ करा. 

 

प्रकाशक

जायको पब्लिशिंग हाऊस 

ISBN

9788184951233

पुस्तकाची पाने

295

बाईंडिंग

पेपरबॅक We Also Recommend