
मी अल्बर्ट एलिस ( Mi Albert Ellis ) - डॉ. अंजली जोशी
behumanist.com book suggestion
*मानसशास्त्र/व्यक्तिमत्व विकास*
अल्बर्ट एलिस एक ९ वर्षांचा मुलगा तोही असा की ज्याला वयाच्या केवळ ५व्या वर्षांपासून किडनीचा आजार झालेला. कोणीतरी त्याला लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आई-वडील असूनही नसल्यासारखेच, ते कधी भेटायलाही येत नसत. आयुष्यात एवढ्या लहानपणापासून इतक्या अडचणी किती निराशा येत असेल?
पुढे हाच 'अल्बर्ट एलिस' जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला.
आज जगभरात प्रसिद्ध असलेल्या Rational Emotive Behavior Therapy - विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे प्रणेते व प्रवर्तक डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या मानसशास्त्रावरील विचार व सिद्धांत यांचा अभ्यास करून, त्यांनी मांडलेलं विवेकी आणि मानवतावादी तत्वज्ञान त्यांच्या जीवनपटाद्वारे सोप्या शब्दांत सांगणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी !
"आपल्यावर येणारी परिस्थिती ही कधीही चांगली अथवा वाईट नसते, ती कायम तटस्थ असते; आपणच आपल्या सोयीनुसार तिचा चांगली अथवा वाईट असे अर्थ लावत असतो." हा युक्तिवाद स्वतःशी करत जीवनातील प्रत्येक संकटाला निर्भीडपणे सामोरा जाणारा अल्बर्ट एलि या कादंबरीत आपल्याला बघायला मिळतो व आपणही त्याच्या सोबत संकटाशी दोन हात करायला तयार होतो.
अल्बर्ट एलिस यांच्या "माझं जीवन हाच माझा संदेश आहे" या उद्गारांमधील यथार्थता त्यांच्या या कादंबरीच्या प्रत्येक पानातून दिसून येते.
जीवनाच्या सर्व अंगांना भिडणारं तत्वज्ञान सामावलेला अल्बर्ट एलिस यांचा हा जीवनप्रवास लांब पल्ल्याच्या नैराश्यातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपलं जीवन सुखी, समाधानी आणि सर्जनशील बनविण्याचा एक राजमार्ग आहे.
प्रकाशक | शब्द पब्लिकेशन |
---|---|
ISBN |
9789382364108 |
पुस्तकाची पाने | 340 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |