
नग्नसत्य ( Nagnasatya ) - मुक्ता मनोहर
का केले जातात स्त्रियांवर बलात्कार ?
समस्त स्त्रियांच्या मनात दहशत निर्माण करणारं पुरुषी हत्यार म्हणजे बलात्कार.
या पुरुषी दहशतीमागे लपलेले आहेत सामाजिक संदर्भ.
साऱ्या जगात ही स्थिती दिसते. आपल्या भारतातही तेच.
स्त्रियाच पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ
पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरं नाही.
अशा समजांपलीकडे बलात्काराचे रूप दडलेलं आहे.
टोळीवाद, गणवाद, जातीवाद, धर्मवाद, देशवाद,
बाजारपेठीय वर्चस्ववाद-चंगळवाद,
जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी
हे सगळेच बलात्काराचे खास दोस्त आहेत.
बलात्काराचं हे धगधगतं वास्तव लक्षात घेतल्याशिवाय
त्याचा शेवट होणार नाही.
बलात्कारी संस्कृती कशी आणि कधी निर्माण झाली
याचा वेध घेत, स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेला
सर्जनशील समाज निर्माण करण्याचं एक आव्हान
हे पुस्तक समोर ठेवतं.
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-93-81636-01-5 |
पुस्तकाची पाने |
320
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |