नेटफ्लिक्स आणि पुनः शोधांची संस्कृती - रीड हेस्टिंग्ज, एरिन मायर
गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळायला हव्यात
तुमच्या टीमवर विश्वास ठेवा.
आत्यंतिक प्रामाणिकपणा दाखवा.
आणि कधीही बॉसची मर्जी राखण्यासाठी धडपडू नका.
एका अभूतपूर्व सांस्कृतिक प्रयोगातील हे काही मूलभूत नियम आहेत,
पोस्टाने डीव्हीडी पाठवणाऱ्या सेवेचं विद्युतवेगाने एका अफाट यशस्वी आणि
संपूर्णत: वेगळ्या, डिस्नेला टक्कर देणाऱ्या स्ट्रीमिंग महाशक्तीमध्ये रूपांतर
झालं, त्यामागील ही कहाणी आहे.
नवनिर्माणाच्या, नेतृत्व आणि काहीतरी अभिनव करण्याच्या इच्छेने
झपाटलेल्या प्रत्येकाने "नेटफ्लिक्स संस्कृती आणि नियमांची पारायणं
करायला हवीत. अविश्वसनीय वाटेल असा स्पष्टवक्तेपणा आणि अंतर्गत
गोटात शिरायला मिळालेल्या अभूतपूर्व संधीचा पुरेपूर उपयोग करून
INSEAD प्राध्यापक एरिन मायरने 'नेटफ्लिक्स'चे सीईओ रीड हेस्टिंग्ज
यांना आक्रमक प्रश्न विचारून मिळवलेली उत्तरं अत्यंत वाचनीय आहेत.
'दीर्घकाळ कार्यरत राहील अशी उत्कृष्ट कंपनी उभारण्यासाठी काय करावं ही
गोष्ट रीड हेस्टिंग्ज फार लवकर शिकले. 'नेटफ्लिक्स'ला अतिशय प्रभावी आणि
वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या संस्कृतीचे धडे रीड आणि
एरिन मायरने 'नो रुल्स सल्स' या पुस्तकात दिले आहेत. तपशिलासहित
असंख्य उदाहरणं देऊन हेस्टिंग्जनी एक चटकदार मिश्रण स्वातंत्र्य आणि
उत्तरदायित्वाच्या चौकटीमध्ये कसं बेमालूम बसवलं, हे त्या दोघांनी चांगल्या
पद्धतीने दाखवलं आहे. वेगवान आणि उत्तम लेखनशैली, समयोचित आणि
सर्वकालीन, कल्पक आणि ज्ञानपूर्ण असं हे पुस्तक नक्की वाचा आणि
'नेटफ्लिक्स'च्या यशाचं रहस्य खुद्द निर्मात्याकडून जाणून घ्या!'
पुस्तकाचे नाव | नेटफ्लिक्स आणि पुनः शोधांची संस्कृती /No Rules Rules |
---|---|
लेखक | रीड हेस्टिंग्ज, एरिन मायर / B J Fogg |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
9788194870104 |
पुस्तकाची पाने | |
बाईंडिंग | पेपरबॅक |