वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्युट - गॅब्रिअल गार्सिया मार्केझ

वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्युट - गॅब्रिअल गार्सिया मार्केझ

  • Rs. 360.00
    Unit price per 
  • Save Rs. 39

Order On WhatsApp

माकोन्दो इथल्या जिप्सींच्या वार्षिक भेटीच्या आगमनाची वार्ता वेगवेगळ्या पिपाण्या आणि नगारे यांच्या कल्लोळामुळे सहजच मिळायची. नव्यानेच वसलेल्या त्या गावात होझे औरेलियानो बुयेंदियाने त्याची ठाम वृत्तीची बायको अर्सूला हिच्याबरोबर सहजीवनाला नव्यानेच सुरुवात केली होती. गूढ मेल्कियादेस, त्याने लावलेले शोध, साहसाच्या त्याच्या कथा या सगळ्यांमुळे औरेलियानो बुयेंदिया आणि त्याच्या वडिलांना उत्कंठता जाणवत असे. त्या वृद्ध जिप्सीने त्या दोघांच्या हातात ठेवलेल्या हस्तलिखिताचा अर्थ त्यांना कळत नव्हता आणि त्याचं महत्त्वही ते दोघं जाणू शकत नव्हते. गूढ, जादुई, उत्कंठावर्धक अशी ही कथा म्हणजे अनाकलनीय शैलीने जिवंत झालेला कॅलिडोस्कोपच आहे.

गॅब्रिअल गार्सिया मार्केझ यांच्या नावावर आइज ऑफ ब्लू डॉग (1947), लीफ स्टॉर्म (1955), नो वन राइट्स टू कर्नल (1958), वन हन्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड (1967), इनोसन्ट एरेन्डिरा अँड अदर स्टोरीज् (1972), लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा (1985), द जनरल इन हिज लॅबिरिन्थ (1989), स्ट्रेंज पिलग्रिम्स (1992) आणि ऑफ लव्ह अँड अदर डेमॉन्स (1994) यांसारख्या अनेक कथासंग्रह आणि कादंबर्‍या जमा आहेत. एल एस्पेक्टडोर या कोलंबियन वृत्तपत्रासाठी त्यांनी वार्ताहर म्हणून काम पाहिले आहे, तसेच रोम, पॅरिस, बार्सिलोना, कॅरॅकस आणि न्यू यॉर्क येथे फॉरेन करस्पॉन्डन्ट म्हणून काम पाहिले आहे. 1982 साली त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

 पुस्तक  वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्युट  /One Hundred Years of Solitude
लेखक गॅब्रिअल गार्सिया मार्केझ/Gabriel Garcia Marquez
प्रकाशक मंजुळ पब्लिशिंग हाऊस 
ISBN

9789390085682

पुस्तकाची पाने 428
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend