प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा - संतोष अरसोड

 • Rs. 225.00
  Unit price per 
 • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

संत गाडगेबाबा ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार आहे. हा विचार विवेकवादी आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे.  समाजाला धार्मिक, आर्थिक, मानसिक भ्रमातून मुक्ती देणारा हा विचार आहे.  माणसाला केंद्रबिंदू ठरवत इथल्या पाखंडी व्यवस्थेचे बुरूज  उद्ध्वस्त करण्याची ताकद संत गाडगेबाबांनी कीर्तनामधून समाजमनात पेरली.  त्यांनी कधीही शाळेची पायरी चढली नव्हती.

रस्त्याच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलेला हा खरा लोकशिक्षक होता. या महानायकाने देशभरात  प्रबोधनाचा प्रकाश वाटला. अनेक विद्यापीठांना जे शक्य नाही ते या लोकविद्यापीठाने करून दाखवले. त्यांनी निर्माण केलेल्या प्रकाश पर्वात प्रत्येकाने उजळून निघावे म्हणून शब्दफुले वाहन्याचा हा प्रयत्न आहे. प्रबोधनाच्या चळवळीत काम करीत असताना कार्यकर्त्यांची जडणघडण कशी व्हावी यासाठी हे पुस्तक कार्यकर्त्यांना निश्‍चितच बळ देईल.  ज्ञान वंचितांना ज्ञानाभिमुख करण्याचा संत गाडगेबाबांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड आहे. समाजातील प्रबोधनाचे विझलेले निखारे पुन्हा प्रज्वलित होतील,

हीच भावना या लिखाणामागे आहे.


लेखक परिचय

सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार. यवतमाळ जिल्ह्यातील नेर या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य. औषधनिर्माण शास्त्राची पदविका असूनही औषधी व्यवसायात मन न रमल्याने सामाजिक कार्यात सहभाग. दैनिक लोकमतमध्ये तालुका प्रतिनिधी ते यवतमाळ कार्यालयात दोन वर्षे उपसंपादक म्हणून काम. पत्रकारितेतून शेती व मानवी प्रश्‍नांना प्राधान्य. सामाजिक चळवळ गावखेड्यात पोहोचविण्यासाठी वाणी आणि लेखणीचा प्रभावी वापर करणारा  कार्यकर्ता. शिक्षणापासून एखादा हुशार विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हातभार लावणारा संवेदनशील माणूस म्हणून ओळख. संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक चळवळीवर अनेक ठिकाणी प्रबोधनपर व्याख्याने. विदर्भातील अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग. पुस्तकासोबतच माणसं वाचणे ही त्यांची खासियत. सध्या ‘मीडिया वॉच’या अनियतकालिकात कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत.

 

  पुस्तक 

  प्रबोधन  पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा / prabodhan Pandharicha Krantikari Sant Gadgebaba

  लेखक 

  संतोष अरसोड / Santosh Arsod

  प्रकाशक मनोविकास प्रकाशन
  ISBN

  978-81-95235-06-3

  पुस्तकाची पाने 192
  बाईंडिंग

  पेपरबॅक 


  We Also Recommend