प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे -यशवंत मनोहर
“यशवंत मनोहर यांचे 'प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे हे
पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता
प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे.
व्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि
इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे. महाराष्ट्रातील
परिवर्तनाच्या चळवळीची सांगड घेऊन अण्णा भाऊ मूलतत्त्ववादी मराठी
साहित्यप्रवाहाच्या विरुद्ध पोहत होते. या पोहण्यानेच त्यांच्या प्रतिभेला
तेजःपुज केले. या पाशवी विरोधांनीच अण्णा भाऊंच्या प्रतिभेला
लखलखती धार लावली. सामान्यांना हतबल करणारी दुःखे प्रतिभावंतांपुढे
स्वतःच हतबल होतात. ही प्रक्रिया प्रतिभावंतांना ज्ञाताची कुंपणे
ओलांडणारे पंख देते.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात अभावांवर, अन्यायांवर आणि
उपेक्षेवर मात करणाऱ्या उमेदींची अजिंक्य गाज आहे. हे माणसाच्या आदिम
ऊर्जेचेच शक्तिसौष्ठव आहे. महाराष्ट्रात एक संघर्षच लिहीत होता त्या
संघर्षाने अण्णा भाऊ साठे हे नाव घेतले होते. या संघर्षाची प्रतिभा
अंधारातल्या आरशासारखी निरुपयोगी नव्हती तर ती अंधारनिर्मूलन
करणाऱ्या उजेडाच्या आंदोलनासारखी होती. यशवंत मनोहर यांचे हे
अभिवादनपुस्तक जन्मशताब्दीच्या निमित्ताने अण्णा भाऊंच्या युद्धप्रतिभेला
अंतःकरणपूर्वक प्रणाम करीत आहे.

पुस्तकाचे नाव
|
प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे / Pratibhavant Sahityik : Anna Bhau Sathe |
लेखक |
यशवंत मनोहर / Yashawant Manohar |
प्रकाशक |
मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
978-93-84600-39-6 |
पुस्तकाची पाने |
168 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |
We Also Recommend
Customer Reviews
Based on 1 review
Write a review