प्रोपगंडा ( Propaganda ) - रवि आमले

प्रोपगंडा ( Propaganda ) - रवि आमले

  • Rs. 360.00
    Unit price per 
  • Save Rs. 40
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून?कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती?सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो?आपली मते खरोखरच आपली असतात का?

आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का?

सत्य मानत असतो ते सत्यच असते का?

की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला

एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे?

तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात?

या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते?

साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात?

बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात?

एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते?

कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात?

 हे सारे करणारे असते तरी कोण?

अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार!

 ही कहाणी आहे या सगळ्याची.

अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची.

आपल्याला वेढून टाकणार्‍या प्रोपगंडाची.

त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट,

परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.

  

प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN

978-81-943491-5-0

पुस्तकाची पाने 380 
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend